मुंबईत मोठ्या गणेशमूर्तींची परंपरा कोणी सुरू केली?

पुढारी वृत्तसेवा

मुंबईत मोठ्या गणेशमूर्तींची परंपरा कोणी सुरू केली?

२२ फुटांच्या भव्य बाप्पामागची रंजक कहाणी जाणून घ्या!

मुंबईचा गणेशोत्सव म्हणजे भव्यतेचा उत्सव!

आज लालबागसह अनेक ठिकाणी उंच आणि आकर्षक गणेशमूर्ती पाहायला मिळतात. पण ही परंपरा नेमकी सुरू कोणी केली?

या परंपरेमागे होते मास्तर दीनानाथ वेलिंग

प्रसिद्ध शिल्पकार मास्तर दीनानाथ वेलिंग यांनी मुंबईतील भव्य गणेशमूर्तींच्या परंपरेला नवी दिशा दिली.

१९७७ मध्ये घडला ऐतिहासिक क्षण

दीनानाथ वेलिंग यांनी १९७७ साली लालबागच्या गणेश गल्ली मंडळासाठी तब्बल २२ फूट उंच गणेशमूर्ती साकारली.

पहिली भव्य २२ फुटी मूर्ती

ही मूर्ती केवळ उंच नव्हती, तर तिच्या भव्यतेने मुंबईतील गणेशोत्सवाचे स्वरूप बदलून टाकले.

१३ वर्षे कायम ठेवली भव्यतेची परंपरा

१९७७ ते १९८९ या काळात मास्तर दीनानाथ वेलिंग यांनी विविध रूपांमध्ये २२ फुटांच्या गणेशमूर्ती साकारल्या.

दरवर्षी नवे रूप, नवी उत्सुकता

बाप्पाचे वेगवेगळे अवतार आणि भव्य मूर्ती पाहण्यासाठी भाविकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण होऊ लागला.

मुंबईत सुरू झाला मोठ्या मूर्तींचा नवा ट्रेंड

गणेश गल्लीतील या भव्य मूर्तींनंतर मुंबईतील इतर गणेश मंडळांनाही मोठ्या आणि आकर्षक मूर्तींची प्रेरणा मिळाली.

सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात वेगळी...

सार्वजनिक गणेशोत्सवाला लोकमान्य टिळकांनी १८९३ मध्ये मोठी चालना दिली. मात्र भव्य आणि उंच गणेशमूर्तींची परंपरा पुढे दीनानाथ वेलिंग यांनी लोकप्रिय केली.

२२ फुटांच्या बाप्पामागे एका कलाकाराची दूरदृष्टी

मास्तर दीनानाथ वेलिंग यांनी सुरू केलेली भव्यतेची परंपरा आजही मुंबईच्या गणेशोत्सवाची खास ओळख बनली आहे.

Panchakarma | शरीराला डिटॉक्स करणारे आयुर्वेदातील 'पंचकर्म' नक्की काय आहे?

येथे क्लिक करा