Rahul Shelke
सकाळी उठल्यावर उशी ओलसर दिसते? तोंडाजवळ लाळ लागलेली जाणवतेय? असं अनेकांसोबत होतं.
नाही! झोपेत तोंडातून लाळ येण्याची समस्या मोठ्यांमध्येही आहे.
झोपेत लाळ वाहण्याला ड्रूलिंग (Drooling) म्हणतात. लाळ खूप जास्त असेल तर त्याला हायपरसेलिवेशन म्हणतात.
पोटावर झोपल्यास लाळ तोंडात न राहता बाहेर येते. विशेषतः जे लोक तोंडाने श्वास घेतात त्यांच्यात ही समस्या जास्त असते.
नाक बंद असेल तर आपोआप तोंड उघडं राहतं. सायनस, सर्दी, अॅलर्जीमुळे झोपेत लाळ बाहेर पडते.
काही औषधांमुळे लाळ जास्त तयार होते. मानसिक आजार, अल्झायमर किंवा काही अँटिबायोटिक्स यामुळेही ड्रूलिंग होऊ शकते.
जर लाळेसोबत जोरात घोरणं, रात्री गुदमरल्यासारखं होणं, सकाळी घसा कोरडा वाटणं.. असं होत असेल तर हा स्लीप अॅपनियाचा इशारा असू शकतो.
पाठेवर झोपण्याची सवय लावा, तोंड व दात स्वच्छ ठेवा, पुरेसं पाणी प्या, सायनसचा त्रास असेल तर उपचार घ्या.
झोपेत तोंडातून लाळ येण्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.