Rahul Shelke
अंडं उकडल्यानंतर ते किती दिवस सुरक्षित राहतं, हा प्रश्न अनेकांना पडतो. योग्य पद्धतीने ठेवलं तर उकडलेलं अंडं काही दिवस नक्कीच खाता येतं.
अंडं पूर्णपणे उकडलेलं असेल आणि फ्रिजमध्ये ठेवलेलं असेल, तर ते साधारण 7 दिवसांपर्यंत खाण्यायोग्य राहतं.
आरोग्याच्या दृष्टीने उकडलेलं अंडं 2 ते 3 दिवसांत खाल्लं तर जास्त चांगलं. जास्त दिवस ठेवलं तर चव बदलू शकते.
हाफ बॉइल किंवा कमी उकडलेलं अंडं जास्त काळ सुरक्षित राहत नाही. अशा अंड्यांमध्ये जंतुसंसर्गाचा धोका जास्त असतो.
अंडं उकडल्यानंतर ते लगेच थंड पाण्यात घालणं गरजेचं असतं. यामुळे अंडं पटकन थंड होतं आणि आत बॅक्टेरिया वाढण्याचा धोका कमी होतो.
साल असलेलं अंडं जास्त सुरक्षित राहतं. सालं हे नैसर्गिक संरक्षण कवचासारखं असतं. सोललेलं अंडं ठेवलं असेल, तर ते हवाबंद डब्यात ठेवणं गरजेचं.
फ्रिजच्या दारात अंडं ठेवणं टाळावं. दार उघड-बंद होत राहिल्याने तापमान बदलतं आणि अंडं लवकर खराब होऊ शकतं.
उकडलेल्या अंड्याला दुर्गंध येत असेल, तर ते अजिबात खाऊ नये. असं अंडं खाल्ल्यास फूड पॉइजनिंगचा धोका असतो.
कधी कधी अंड्याच्या पिवळ्या बलकाभोवती हिरवट किंवा करडं वर्तुळ दिसतं. हे अंडं खराब झाल्याचं लक्षण नसतं. अंडं जास्त वेळ उकडलं गेलं असेल तर असं होतं.