Pen cap hole purpose : पेनाच्या टोपनातील छिद्राचा नेमका उपयोग कशासाठी? जाणून घ्या...

Asit Banage

पेनच्या टोपनावर असलेले छोटे छिद्र प्रामुख्याने सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.

चुकून पेनाचे टोपण तोंडात घेऊन ते घशात अडकल्यास या छिद्रातून हवा जाण्यास मदत होऊ शकते.

त्यामुळे श्वसनमार्ग पूर्णपणे बंद होण्याचा धोका काही प्रमाणात कमी होऊ शकतो.

विशेषतः लहान मुले पेनाचे टोपण तोंडात घेण्याची शक्यता असल्याने हे छिद्र महत्त्वाचे ठरते.

काही पेनच्या टोपनांमध्ये छिद्रामुळे हवेचा दाब संतुलित ठेवण्यासही मदत होते.

टोपण काढताना किंवा लावताना हवेच्या हालचालीसाठीही या रचनेचा उपयोग होऊ शकतो.

प्रत्येक पेनच्या टोपनावरील छिद्राचा उद्देश डिझाइननुसार वेगळा असू शकतो.

म्हणजेच पेनच्या टोपनावरील हे छोटे छिद्र केवळ सौंदर्यासाठी नसून त्यामागे सुरक्षा आणि अभियांत्रिकीचा विचार आहे.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...