Parenting Tips | मुलांच्या मनातील 'या' ८ गोष्टी पालकांनी समजून घ्याव्यात

पुढारी वृत्तसेवा

मानसशास्त्रज्ञांच्या मते, मुलांची भावनिक शब्दसंपदा हळूहळू विकसित होते, त्यामुळे त्यांच्या अनेक गरजा ते न सांगता वेगवेगळ्या कृतींमधून व्यक्त करतात

‘तू असे करायला हवे होते’ असे सांगण्यापेक्षा त्यांचे म्हणणे ऐकून घेणे आणि त्यांना समजून घेणे अधिक महत्त्वाचे असते

झोपण्यापूर्वी एकत्र पुस्तक वाचणे किंवा ‘आजचा दिवस कसा गेला?’ असे मनापासून विचारणे, या छोट्या गोष्टी मुलांच्या भावनिक सुरक्षिततेची पायाभरणी करतात

मुलांचे हट्ट, ओरडणे किंवा ऐकण्यास नकार देणे म्हणजे ते ‘वाईट’ मूल आहे, असे नेहमीच नसते, त्यांच्या वर्तनामागे दडलेली भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा

वारंवार होणारी तुलना मुलांच्या मनात नकळत ‘मी पुरेसा चांगला नाही’ अशी भावना निर्माण होऊ शकते. मात्र, प्रोत्साहनामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो

चूक झाली की स्वतःवर टीका करायची की स्वतःशी सहानुभूतीने वागायचे, हे मुले अनेकदा पालकांकडून शिकतात

मुलांचे बोलणे सुरू असताना पालकांचे लक्ष मोबाईलच्या स्क्रीनकडे, ई-मेलकडे किंवा टीव्हीकडे असेल, तर ते मुलांच्या लक्षात येते, त्यामुळे त्यांच्यामध्ये दुर्लक्षित केल्याची भावना निर्माण होते

मुले मोठी होत जातात तसे प्रेम व्यक्त करण्याची त्यांची पद्धत बदलते. किशोरवयीन मुले डोळे वटारून प्रतिक्रिया देऊ शकतात, तर लहान मुले ‘मला एकटे सोडा’अशा पद्धतीने वागतात

मुले चुका करणार, गृहपाठ विसरतील, चुकीचे काही बोलतील, नियम मोडतील किंवा आपल्या वागण्याने निराशा करतील, त्यानंतरही पालकांनी आपले प्रेम कमी होणार नाही, याची काळजी घ्यावी

येथे क्लिक करा