Rahul Shelke
बाळ जन्मल्यानंतर बहुतेक वेळा रडतचं असतं. हा आवाज आई-वडिलांसाठी खूप आनंदाचा असतो.
आईच्या पोटात उबदार वातावरण, मंद प्रकाश आणि शांतता असते. बाहेर मात्र थंडी, उजेड आणि गोंगाट असतो.
या अचानक बदलाला बाळाचं शरीर रडून प्रतिसाद देतं. हे रडणं म्हणजे नैसर्गिक प्रतिक्रिया आहे.
गर्भात बाळ श्वास घेत नाही, आईकडून नाळेद्वारे ऑक्सिजन मिळतो. जन्मताच स्वतः श्वास घ्यायला त्रास होतो त्यामुळे रडणं आवश्यक असतं.
रडताना बाळ जोरात श्वास आत–बाहेर घेतं. यामुळे फुफ्फुसं फुलतात आणि आतलं द्रव बाहेर पडतं.
पहिल्या रडण्याने हृदयाची धडधड वाढते, रक्तप्रवाह सुरू होतो आणि शरीर सक्रिय होतं.
बाळ रडलं म्हणजे त्याचं हृदय, फुफ्फुसं आणि मेंदू योग्यरीत्या काम करत आहेत, असा त्याचा अर्थ होतो.
हसणं ही भावना आहे. ती मेंदूच्या वाढीशी जोडलेली असते. जन्मावेळी मेंदू इतका विकसित नसतो.
भूक, थंडी, त्रास होत असेल तर बाळ हे सगळं रडूनच सांगतं. रडणं म्हणजे त्याचा संवाद.
जन्मावेळी बाळ रडलं, तर ते आरोग्यासाठी चांगलं असतं. हसू थोड्या आठवड्यांनी येतं… पण रडणं ही जीवनाची सुरुवात असते.