Rahul Shelke
हिजाब घालणं याबाबत मतभेद असून अनेकांच्या मते तो वैयक्तिक निवडीचा विषय आहे. भारत, इराण आणि पाश्चिमात्य देशांत हा प्रश्न नेहमी चर्चेत असतो.
इतिहासकार सांगतात दक्षिण आशियात हिजाब कधी सुरू झाला, याचे ठोस पुरावे नाहीत.
तुर्क आणि मुघल महिलांनी चेहरा झाकला नव्हता. त्या घोडेस्वारी, पोलो खेळत आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत होत्या.
अकबरानंतर मध्यमवर्ग वाढला. ‘पवित्रता’ दाखवण्यासाठी महिलांनी हिजाब स्वीकारायला सुरुवात केली.
तज्ज्ञांच्या मते, बुर्का आणि हिजाब हे पितृसत्ताक विचारसरणीचं प्रतीक आहेत.
1960–70 मध्ये महिलांनी धार्मिक कपड्यांना विरोध केला. पण 1980 नंतर सऊदी-वहाबी इस्लामच्या प्रभावामुळे हिजाब घालण्याचे प्रमाण वाढले.
हिजाबने महिलांना ‘धार्मिक आणि आधुनिक’ अशी ओळख दिली, असं काही तज्ज्ञ सांगतात.
लखनऊ, मुरादाबादसारख्या शहरांत हिजाब विक्रीत 10 ते 20 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
हिजाब हा केवळ धार्मिक विषय नाही. तो इतिहास, राजकारण, स्त्रीस्वातंत्र्य आणि व्यवसायाशी जोडलेला आहे.