पुढारी वृत्तसेवा
गॅस सिलेंडर आपण रोज वापरतो, पण यामागचं कारण माहित आहे का?
गॅस सिलेंडरच्या तळाशी असलेली ही छिद्रं फक्त डिझाईन नाहीत… तर ती तुमच्या सुरक्षेशी थेट जोडलेली आहेत.
ही छिद्रं हवा खेळती ठेवतात. यामुळे सिलेंडरच्या तळाशी ओलावा राहत नाही
पाणी किंवा ओलावा आला तर सिलेंडर गंजू (Rust) शकतो. छिद्रांमुळे तो लवकर सुकतो आणि सिलेंडर सुरक्षित राहतो.
LPG हा जड वायू असतो. गळती झाली तर गॅस खाली साचू शकतो.
ही छिद्रं गॅसला बाहेर पडण्यास मदत करतात. यामुळे स्फोटाचा धोका कमी होतो.
सिलेंडरचा तळ (Base Ring) मजबूत राहणं खूप महत्त्वाचं आहे. छिद्रं त्याचा टिकाऊपणा वाढवतात.
छिद्रांचा आकार वेगवेगळा असतो. गोल, डायमंड शेप यावरून कंपनी ओळखता येते.
ही छिद्रं कधीही झाकू नका किंवा बंद करू नका. ते धोकादायक ठरू शकतं.