घरी बोलघेवडी, बाहेर मात्र शांत! मुलं असं का वागतात? कारण जाणून घ्या

पुढारी वृत्तसेवा

बोलघेवडी, बाहेर मात्र शांत!

मुलं घरी खूप बोलतात. आई-बाबांशी मनमोकळ्या गप्पा मारतात. पण घराबाहेर गेल्यावर मात्र शांत होतात. असं का होतं? जाणून घेऊया यामागची कारणं.

घरात मुलांना सुरक्षित वाटतं

घर मुलांसाठी सुरक्षित जागा असते. इथे त्यांना कोणाची भीती वाटत नाही. चूक झाली तरी आपली माणसं समजून घेतात. म्हणून मुलं घरात मोकळेपणाने बोलतात.

बाहेरचं वातावरण वेगळं असतं

बाहेर गेल्यावर मुलांना नवे लोक भेटतात. जागाही अनेकदा नवीन असते. काही मुलांना हे वातावरण अनोळखी वाटतं. त्यामुळे ती लगेच बोलत नाहीत.

काही मुलं आधी निरीक्षण करतात

प्रत्येक मूल लगेच इतरांमध्ये मिसळत नाही. काही मुलं आधी शांत राहतात. ती आजूबाजूच्या लोकांचं निरीक्षण करतात. परिस्थिती समजून घेतल्यानंतरच बोलतात.

लाजाळू स्वभावही कारण असू शकतो

काही मुलांचा स्वभाव लाजाळू असतो. त्यांना नवीन व्यक्तीशी बोलायला वेळ लागतो. याचा अर्थ मुलामध्ये काही समस्या आहे असं नाही. त्याला फक्त थोडा वेळ आणि आधार हवा असतो.

मुलाला बोलण्यासाठी जबरदस्ती करू नका

नातेवाईक भेटले की पालक म्हणतात, ‘Hi म्हण.’ ‘कविता म्हणून दाखव.’ ‘टाटा कर.’ पण मुलावर असा दबाव टाकणं टाळा. यामुळे त्याचा संकोच आणखी वाढू शकतो.

आधी मुलाला सुरक्षित वाटू द्या

मुलाला लगेच बोलायला लावू नका. त्याला परिस्थितीशी जुळवून घेऊ द्या. त्याच्यासोबत शांतपणे राहा. हळूहळू त्याचा आत्मविश्वास वाढेल.

रोज मुलाशी गप्पा मारा

मुलाशी रोज संवाद साधा. ‘आज शाळेत काय झालं?’ असं विचारा. ‘मित्रांसोबत काय केलं?’ असं विचारा. ‘आज तुला काय आवडलं?’ हेही विचारा. यामुळे मुलं मनातलं सांगायला शिकतात.

प्रत्येक चूक लगेच दुरुस्त करू नका

मुलं बोलताना चुका करतात. भाषेच्या चुका होणं स्वाभाविक आहे. प्रत्येक वाक्य लगेच दुरुस्त करू नका. मुलाला आधी पूर्ण बोलू द्या. त्याला भीती न वाटणं अधिक महत्त्वाचं आहे.

आत्मविश्वास वाढण्यासाठी वेळ द्या

प्रत्येक मूल वेगळं असतं. काही मुलं लगेच बोलतात. काही मुलांना वेळ लागतो. मुलावर दबाव टाकण्यापेक्षा त्याला समजून घ्या. त्याचं म्हणणं शांतपणे ऐका. यातूनच मुलाचा आत्मविश्वास हळूहळू वाढतो.

थंडावा अन् पॉझिटिव्ह ऊर्जा! घराच्या भिंतींना कोणते रंग द्यावेत? वाचा स्मार्ट इंटीरियर गाईड

Best House Wall Colors
येथे क्लिक करा