जपानमधील लोक रात्री आंघोळ का करतात? जाणून घ्या यामागचं विज्ञान

पुढारी वृत्तसेवा

जपानी लोक रात्री आंघोळ का करतात?

यामागे आहे विज्ञान, आरोग्य आणि स्वच्छतेचं खास कारण!

भारतात सकाळची, जपानमध्ये रात्रीची आंघोळ!

भारतात सकाळी आंघोळ करण्याची परंपरा आहे. मात्र जपानमध्ये बहुतेक लोक झोपण्यापूर्वी आंघोळ करतात.

फक्त स्वच्छतेसाठी नाही...

जपानमध्ये आंघोळ ही केवळ शरीर स्वच्छ करण्याची प्रक्रिया नसून मनाला शांत करण्याचाही एक महत्त्वाचा भाग मानला जातो.

गरम पाण्याने मिळतो आराम

झोपण्यापूर्वी गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरीराचा थकवा कमी होतो आणि स्नायूंना आराम मिळतो.

चांगल्या झोपेचं रहस्य

तज्ज्ञांच्या मते, गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरीर झोपेसाठी तयार होतं आणि लवकर व गाढ झोप लागण्यास मदत होते.

'ओफुरो'ची खास परंपरा

जपानमध्ये गरम पाण्याच्या टबमध्ये म्हणजेच 'ओफुरो'मध्ये आंघोळ करण्याची जुनी परंपरा आहे. यामुळे मानसिक शांतता मिळते.

स्वच्छतेला सर्वाधिक प्राधान्य

दिवसभर बाहेर राहिल्यानंतर धूळ, घाम आणि प्रदूषण घेऊन बेडवर जाणं जपानी लोकांना आवडत नाही.

त्वचेसाठीही फायदेशीर

रात्री आंघोळ केल्याने दिवसभरातील घाण, धूळ आणि प्रदूषण दूर होतं. त्यामुळे त्वचा अधिक स्वच्छ आणि निरोगी राहते.

रिसर्च काय सांगतो?

अनेक संशोधनांनुसार झोपण्यापूर्वी गरम पाण्याने आंघोळ केल्याने तणाव कमी होतो आणि झोप चांगली लागते.

सकाळी की रात्री... कधी आंघोळ करावी?

दोन्ही वेळा आंघोळ करण्याचे फायदे आहेत. मात्र जपानी लोक रात्री आंघोळ करून स्वच्छता, आराम आणि चांगल्या झोपेला अधिक महत्त्व देतात.

शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना जंजिरा किल्ला का जिंकता आला नाही?

येथे क्लिक करा