पुढारी वृत्तसेवा
जंजिरा किल्ला इतका अभेद्य का होता?
350 वर्षे कोणीही जिंकू न शकलेला समुद्रातील अजिंक्य किल्ला... शिवाजी महाराज, संभाजी महाराज, पोर्तुगीज आणि इंग्रजही अपयशी ठरले.
जंजिरा म्हणजे नेमकं काय?
रायगड जिल्ह्यातील मुरुड किनाऱ्याजवळ समुद्रात वसलेला जंजिरा किल्ला 22 एकर परिसरात पसरलेला आहे. 'जंजिरा' हा शब्द अरबीतील 'जजिरा' म्हणजे 'बेट' या शब्दावरून आला आहे.
350 वर्षे अजिंक्य राहण्याचं रहस्य
40 फूट उंच तटबंदी, 22 बुरुज, समुद्राने वेढलेला आणि अभेद्य संरक्षण व्यवस्था यामुळे हा किल्ला शेकडो वर्षे कोणालाही जिंकता आला नाही.
किल्ल्याची अद्भुत अभियांत्रिकी
किल्ल्याच्या बांधकामात दगड, चुना, गूळ, वाळू आणि वितळलेलं शिसं वापरण्यात आलं. प्रवेशद्वार दूरून दिसत नाही आणि बोट थेट पायऱ्यांजवळच लावावी लागते.
तोफा होत्या सर्वात मोठी ताकद
प्रत्येक बुरुजावर तोफ तैनात होती. 'कलालबांगडी'सारखी अजस्त्र तोफ तब्बल 10 किमी अंतरावर मारा करू शकत होती. शत्रू जवळ येण्यापूर्वीच त्याचा पराभव होत असे.
शिवाजी महाराजांचे अनेक प्रयत्न
1657 ते 1676 दरम्यान शिवाजी महाराजांनी अनेक वेळा जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला. पद्मदुर्ग किल्लाही बांधला, पण सिद्दींच्या मजबूत संरक्षणामुळे प्रत्येक मोहीम अपयशी ठरली.
संभाजी महाराजांनीही हार मानली नाही
1682 मध्ये संभाजी महाराजांनी समुद्रात पूल बांधून किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला. मात्र औरंगजेबाच्या स्वराज्यावरील आक्रमणामुळे ही मोहीम अर्धवट सोडावी लागली.
सिद्दींची कडक सुरक्षा व्यवस्था
किल्ल्यात येण्या-जाण्यासाठी खास मोहोर दिली जात असे. ती हरवली तर थेट मृत्यूदंडाची शिक्षा होती. त्यामुळे किल्ल्यात घुसखोरी जवळपास अशक्य होती.
आजही पर्यटकांचे आकर्षण
स्वातंत्र्यानंतर किल्ला भारत सरकारच्या ताब्यात आला. आज भारतीय पुरातत्त्व विभागाच्या संरक्षणाखाली असलेला जंजिरा किल्ला ऐतिहासिक पर्यटनस्थळांपैकी एक मानला जातो.