Frogs Croak | बेडकांच्या डराव-डरावमागचं गूढ काय? पावसाळ्यातच का वाढतो हा गजर?

पुढारी वृत्तसेवा

पावसाळ्यात बेडूक मोठ्या आवाजात ओरडतो, हे "ओरडणे" नसून त्यामागे जैविक आणि प्रजननाशी संबंधित महत्त्वाचे कारण असते

पावसाळा हा बेडकांचा प्रजनन (वीण) हंगाम असतो. पाण्याची ठिकाणी अंडी घालण्यासाठी आणि पिल्लांच्या (टॅडपोल) वाढीसाठी सुरक्षित असतात

पावसाळ्यात नर बेडूक मादीला आकर्षित करण्यासाठी मोठ्या आवाजात हाका मारतो

एखाद्या परिसरात पावसाळ्यात बेडकांचे आवाज ऐकू येत असतील, तर ते त्या परिसरातील पाणी आणि पर्यावरण निरोगी असल्याचे लक्षण मानले जाते

बेडूक डास, माशा आणि इतर कीटक खाऊन त्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात

पावसाळ्यात बेडूक "ओरडत" नाही, तर प्रजननासाठी जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी आणि आपला परिसर जाहीर करण्यासाठी विशिष्ट आवाज काढतो

बहुतेक प्रजातींमध्ये नर बेडूक आवाज करतो, तर मादी बेडूक सहसा शांत असते किंवा अतिशय कमी आवाज करते

बेडूक मादीला आकर्षित करण्यासाठी ओरडतो, स्वतःचा परिसर जाहीर करण्यासाठी आणि इतर नरांना दूर राहण्याचा इशारा देत असतो

प्रत्येक प्रजातीच्या बेडकाचा आवाज वेगळा असतो, त्यामुळे मादीला आपल्या प्रजातीचा नर ओळखणे सोपे जाते

येथे क्लिक करा