बिस्किटांना छिद्रं का असतात? कारणं ऐकून तुम्हालाही धक्का बसेल

Rahul Shelke

बिस्किटावर छोटे छोटे होल्स का असतात?

चहा सोबत बिस्किट सगळ्यांना आवडतं… पण हे छिद्रं फक्त डिझाइनसाठी असतात का?

Biscuits Holes | Pudhari

डेकोरेशनसाठी नाही तर...

बर्‍याच लोकांना वाटतं, ही छिद्रं फक्त डेकोरेशनसाठी दिली जातात. पण खरं कारण वेगळंच आहे.

Biscuits Holes | Pudhari

बिस्किट तयार कसं होतं?

मैदा/पीठ + साखर + बटर + पाणी + इतर घटक एकत्र केले जातात. मग ते ओव्हनमध्ये बेक केलं जातं.

Biscuits Holes | Pudhari

ओव्हनमध्ये काय घडतं?

ओव्हनच्या उष्णतेमुळे पीठातलं पाणी वाफेत बदलतं. तसंच पीठात अडकलेली हवा फुगते. म्हणजे आतून दबाव वाढतो.

Biscuits Holes | Pudhari

छिद्र नसतील तर काय होतं?

वाफ बाहेर पडली नाही तर, बिस्किट फुगू शकतं आणि आकार बिघडू शकतो

Biscuits Holes | Pudhari

म्हणूनच छिद्रं पाडतात

बिस्किट बनवताना पीठावर छोटे छिद्र पाडले जातात. यांना म्हणतात Docking Holes. त्यांचं काम म्हणजे वाफेला बाहेर जाण्याचा मार्ग देणं.

Biscuits Holes | Pudhari

याचा फायदा काय?

छिद्रांमुळे वाफ आणि हवा व्यवस्थित बाहेर पडते, बिस्किट एकसमान बेक होतात आणि आतूनही नीट शिजतं.

Biscuits Holes | Pudhari

क्रंच आणि टेक्सचर परफेक्ट

साधी, क्रीम बिस्किटं क्रिस्प आणि फ्लॅट हवी असतात. छिद्रांमुळे तो परफेक्ट क्रंच मिळतो!

Biscuits Holes | Pudhari

प्रत्येक बिस्किट सारखं दिसतं

मोठ्या उत्पादनात कन्सिस्टन्सी महत्त्वाची असते. छिद्रांमुळे बिस्किटं वाकडी होत नाहीत, फुगत नाहीत आणि एकसारखी दिसतात.

Biscuits Holes | Pudhari

काही बिस्किटांना होल्स नसतात

सॉफ्ट, केकी, च्युई प्रकारच्या बिस्किटांना अशी छिद्रं कधी कधी लागत नाहीत. रेसिपी आणि टेक्स्चरनुसार फरक पडतो

Biscuits Holes | Pudhari

जास्त वेळ एकाच जागी बसल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो?

Sitting Too Much | Pudhari
येथे क्लिक करा