Rahul Shelke
ऑफिस, मोबाईल, टीव्ही पाहत बसणं वाढलंय. पण एकाजागी जास्त वेळ बसणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं!
खूप वेळ बसल्याने शरीराची हालचाल कमी होते. यामुळे कॅलरी जळत नाहीत आणि मेटाबॉलिझम संथ होतो. हळूहळू वजन वाढण्याची शक्यता वाढते.
खूप वेळ बसल्याने रक्ताभिसरण कमी होतं. यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकतं आणि हृदयावर ताण येतो. हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
बसून राहिल्याने पाय, कंबर, पाठ यांच्या स्नायूची हालचाल होत नाही. यामुळे कडकपणा, लवचिकता कमी होणे आणि सांधेदुखी होऊ शकते.
चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे मान, खांदे आणि कंबरेवर ताण वाढतो. यातून पाठदुखी, मानदुखी वाढू शकते.
खूप वेळ बसल्याने पायांमधील रक्तप्रवाह कमी होतो. पाय सुजणे, जड वाटणे अशी लक्षणं दिसू शकतात. कधी कधी ब्लड क्लॉटचा धोका वाढू शकतो.
बसून राहिल्यावर शरीर कमी ऊर्जा वापरतं. त्यातच जर सारखं खाणं/स्नॅकिंग झालं, तर लठ्ठपणा वाढू शकतो.
खूप वेळ बसून राहिल्याने तणाव, चिंता, कंटाळा वाढू शकतो. ऊर्जाही कमी वाटते आणि उत्साह कमी होतो.
जास्त वेळ बसल्याने पचन प्रक्रिया मंद होऊ शकते. पोट फुगणं, जडपणा, अस्वस्थपणा जाणवू शकतो. चुकीच्या पोस्चरमुळे पोटावर दाबही येतो.
दर 30-40 मिनिटांनी 2 मिनिटं चालणं, फोनवर बोलताना उभं राहणं, दिवसात 5-10 मिनिटे स्ट्रेचिंग, लिफ्टऐवजी शक्य असल्यास जिने वापरा, पाणी जास्त प्या, हालचाल वाढवा