Gold-Silver Utensils: जुन्या काळात राजे-महाराजे सोन्या-चांदीच्या भांड्यांमध्येच काजेवण करायचे? जाणून घ्या रहस्य!

Shivani Badadhe

जुन्या काळात राजवाड्यांमध्ये सोन्या-चांदीच्या भांड्यांचा वापर हा रॉयल लाईफस्टाईल दाखवण्यासाठी केला जात नव्हता तर यामागे ऐतिहासिक, आयुर्वेदिक आणि जोतिषशास्त्रीय कारण आहे.

राजांच्या सोन्या-चांदीच्या भांड्यांना पसंती देण्यामागे मुख्य कारण म्हणजे विषापासून संरक्षण हे होते.

चांदीच्या भांड्यात जेवल्याने चांदीच्या रंगात लगेच बदल दिसून येत असे. या कारणामुळे ते या भांड्याचा वापर ‘सुरक्षा कवच’ म्हणून करत असत.

आयुर्वेदात 'स्वर्ण' म्हणून ओळखले जाणारे सोने, एक उष्ण आणि ऊर्जा देणारा धातू मानला जात असे. सोन्याच्या वापरामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते, स्मरणशक्ती वाढते आणि हृद्याला ताकद मिळते.

चांदीला शीतलता देणारा धातू मानले जात असे. त्यामुळे शरीरातील वात, पित्त आणि कफ या तीन दोषांचे संतुलन राखण्यास मदत होत असे.

चांदीचा संबंध ‘चंद्रा’शी तर सोन्याचा संबंध ‘सुर्या’शी जोडला जातो.

चांदीच्या भांड्यात जेवल्याने मानसिक शांतता, भावनिक संतुलन आणि अचूक निर्णय घेण्याची क्षमता वाढते, अशी श्रद्धा होती. तर सोने हे आत्मविश्वास, नेतृत्व क्षमता आणि ऊर्जेचे प्रतीक मानले होते.

काळ बदलला तशी राजेशाही संपली, पण सोन्या चांदीच्या भांड्यांचे वैशिष्ट्य आजही लोकांना आकर्षित करते.

आजही लोक कुटुंबामध्ये खास धार्मिक प्रसंगी, पूजा-अर्चा किंवा शुभ कार्यात चांदीच्या भांड्याचा वापर करतात.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...