स्वालिया न. शिकलगार
कांदा कापून खूप वेळ ठेवू नये असे काही कारणांमुळे सांगितले जाते
कांदा कापल्यावर त्यातील सल्फरयुक्त संयुगे हवेशी संपर्कात येतात. त्यामुळे ताजी चव, वास हळूहळू कमी होतो
दीर्घकाळ हवेत उघडा राहिल्यास काही अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण कमी होऊ शकते
कापलेला कांदा खोलीच्या तापमानावर बराच वेळ ठेवल्यास त्यावर सूक्ष्मजीव वाढू शकतात. विशेषतः उष्ण आणि दमट वातावरणात
कापलेल्या पृष्ठभागातील पाणी बाष्पीभवन होऊन कांदा कोरडा आणि कमी दर्जाचा होऊ शकतो
कापलेला कांदा विषारी होतो, सगळे जंतू तो लगेच शोषून घेतो, एक लोकप्रिय समजूत आहे
त्याला ठोस वैज्ञानिक आधार नाही. ताजेपणा, चव, अन्नसुरक्षा राखणे हे खरे कारण आहे
कापलेला कांदा स्वच्छ डब्यात किंवा प्लास्टिक रॅपमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवला तर 7–10 दिवस सुरक्षित राहू शकतो