पुढारी वृत्तसेवा
ही फक्त परंपरा नाही… यामागे आहे वैज्ञानिक कारण
आपण अनेकदा पाहिलं असेल मृतदेहाच्या नाकात आणि कानात कापूस ठेवला जातो.
पण नेमकं असं का केलं जातं हे माहिती आहे का?
मृत्यूनंतर शरीरात कुजण्याची (decomposition) प्रक्रिया सुरू होते. या प्रक्रियेमुळे शरीरातील द्रव बाहेर येऊ शकतात.
हे द्रव नाक आणि कानातून बाहेर येऊ नयेत, यासाठी कापूस ठेवला जातो. हे शरीराच्या स्वच्छतेसाठी केलं जातं.
दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे दुर्गंधी. शरीरातून बाहेर येणारे द्रव दुर्गंध तयार करतात.
तसेच, या द्रवांमध्ये सूक्ष्मजंतू (bacteria) असू शकतात. कापूस वापरल्याने संसर्ग पसरण्याचा धोका कमी होतो.
यामागे धार्मिक कारणही आहे. काही ठिकाणी नाकात कापूस किंवा तुळशीची पानं ठेवतात.
अशी मान्यता आहे की, यामुळे आत्म्याला त्रास होत नाही आणि वातावरण शुद्ध राहते.
याशिवाय, कीटक शरीरात शिरू नयेत आणि कुजण्याची प्रक्रिया नियंत्रणात राहावी,
यासाठीही ही पद्धत वापरली जाते.