IPL मध्ये कोणत्या गोलंदाजांनी सर्वाधिक डॉट बॉल टाकले? कोण आहे टॉपवर?

पुढारी वृत्तसेवा

IPL इतिहासातील ‘डॉट बॉल’ किंग्स... कोणत्या गोलंदाजांनी सर्वाधिक डॉट बॉल टाकले?

IPL | Pudhari

क्रिकेटमध्ये ‘डॉट बॉल’ म्हणजे दबाव.. जिथे रन नाही, तिथे विकेटची शक्यता वाढते. IPL मध्ये काही गोलंदाज यात मास्टर आहेत.

IPL | Pudhari

भुवनेश्वर कुमार नंबर 1 वर आहे. 190 मॅचमध्ये तब्बल 1,852 डॉट बॉल्स टाकले आहेत.
एकूण 198 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या 43.9 टक्के चेंडूंवर एकही रन नाही.

IPL | Pudhari

सुनील नारायण हा स्पिनचा जादूगार आहे. 189 मॅचमध्ये 1,720 डॉट बॉल्स टाकले आहेत.
39.6 टक्के चेंडूंवर एकही रन नाही. 92 विकेट्स घेतल्या आहेत.

IPL | Pudhari

आर. अश्विन अनुभवी स्पिनर. 221 मॅचमध्ये 1,664 डॉट बॉल्स टाकले आहेत. 187 विकेट्स घेतल्या आहेत. IPL आणि इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे.

IPL | Pudhari

जसप्रीत बुमराह डेथ ओव्हरचा किंग आहे. 145 मॅचमध्ये 1,420 डॉट बॉल्स टाकले आहेत. 42.6 टक्के चेंडूंवर एकही रन नाही आणि 183 विकेट्स घेतल्या आहेत.

IPL | Pudhari

पियूष चावला हा प्रभावी स्पिनर आहे. 192 मॅचमध्ये 1,358 डॉट बॉल्स टाकले आहेत.
192 विकेट्स घेतल्या आहेत. IPL 2024 मध्ये तो दिसला होता.

IPL | Pudhari

डॉट बॉल्स हे विरोधी टीमवर दबाव टाकण्याचे सर्वात मोठे शस्त्र आहे. हे गोलंदाज याच कौशल्यांमुळे खास ठरले आहेत.

IPL | Pudhari

T20 फॉरमॅटमध्ये डॉट बॉल हे गेमचेंजर ठरतात. एका ओव्हरमध्ये 2-3 डॉट बॉल्स म्हणजे मॅच जिंकण्याची शक्यता वाढते.

IPL | Pudhari

गॅस सिलेंडरच्या खाली छिद्र का असतात? जाणून घ्या शास्त्रीय कारण

LPG Cylinder | Pudhari
येथे क्लिक करा