Anirudha Sankpal
घरातील असो वा कार्यालयातील असो हिंदू प्रथेप्रमाणे प्रत्येक मंगल कार्याची सुरुवात नारळ फोडण्यानेच होते.
संस्कृतमध्ये नारळाला श्रीफळ असं म्हटलं गेलं आहे. श्री म्हणजे लक्ष्मी, म्हणजेच समृद्धी, वैभव आणि भाग्याचं प्रतिक.
शुभकार्यात नारळ वापरल्याने त्या कार्याला यश मिळतं आणि घरात सुख-समृद्धी नांदते, अशी मान्यता पिढ्यानपिढ्या चालत आला आहे.
नारळाचं वरचं कडक कवच म्हणजे आपला अहंकार, तो फोडल्यावर आतील शुभ्र पांढरा गर आणि पाणी म्हणजे आपलं शुद्ध, निर्मळ मन.
देवासमोर नारळ फोडणं म्हणजेच स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून, नम्र आणि शुद्ध मनाने कार्याला सुरुवात करणं.
नारळ हे भगवान गणेश, माता लक्ष्मी आणि विष्णू यांचं अत्यंत लाडकं फळ मानलं जातं.
प्राचीन काळी काही विधींमध्ये बळी देण्याची प्रथा होती.
बळीची प्रथा बंद व्हावी म्हणून, नारळाचा 'बळी', म्हणजेच नारळ फोडण्याची प्रथा सुरू झाली.
आजही शुभकार्यात नारळ अर्पण करून देवाचे आशीर्वाद घेतले जातात.