स्वालिया न. शिकलगार
घरात रोजच्या धावपळीत किंवा वातावरणामुळे नकारात्मकता जाणवत असेल, तर काय करावे?
जेणेकरून काही सोप्या, पारंपरिक उपायांनी घरातील वातावरण प्रसन्न ठेवता येते.
रोज सकाळी घरातील सर्व खिडक्या-दारे काही वेळासाठी उघडी ठेवा
नैसर्गिक सूर्यप्रकाश आणि वाहती हवा घरात खेळू द्या
आठवड्यातून किमान दोनदा फरशी पुसताना पाण्यात थोडे खडे मीठ टाका
असे म्हटले जाते की, मीठ घरातील नकारात्मक लहरी शोषून घेण्याचे काम करते
रोज संध्याकाळी घरात भीमसेनी कापूर आणि दोन लवंग एकत्र जाळा
कापुराच्या सुवासिक धुरामुळे हवेतील सूक्ष्म कीटाणू नष्ट होतात
बंद पडलेली घड्याळे, फुटलेले आरसे, तडे गेलेली भांडी, जुने सामान घरात ठेवू नका
अशी अडगळ नकारात्मक ऊर्जेला आमंत्रण देते.
मुख्य दाराजवळ किंवा गॅलरीत तुळशीचे झाड नक्की लावा
तुळशीचे रोप घरातील वातावरणात सात्विकता आणि शुद्धता टिकवून ठेवते.
सकाळी किंवा संध्याकाळी घरात गायत्री मंत्र, हनुमान चालीसा किंवा शास्त्रीय संगीत लावू शकता
ध्वनीलहरींमुळे घरातील ऊर्जेचे संतुलन उत्तम राहते