Cockroach Control | रात्री किचनमध्येच सर्वाधिक झुरळे का दिसतात? जाणून घ्या कारण

पुढारी वृत्तसेवा

झुरळे रात्रीच अधिक सक्रिय असतात

झुरळे हे निशाचर (Nocturnal) कीटक आहेत. त्यामुळे दिवसभर लपून राहतात आणि रात्री अन्नाच्या शोधात बाहेर पडतात.

get rid of cockroaches | pudhari

किचनमध्ये अन्न सहज मिळते

अन्नाचे कण, उघडे डबे, सिंकजवळील ओलावा आणि कचरा यामुळे झुरळे सर्वाधिक किचनकडे आकर्षित होतात.

Cockroach : झुरळ किती दिवस जगते माहित आहे का? जाणून व्हाल थक्क.. | file photo

ओलावा त्यांना आवडतो

सिंकखालील गळती, ओले कपडे किंवा साचलेले पाणी झुरळांच्या वाढीस पोषक वातावरण तयार करते.

Cockroaches Facts | pudhari photo

अंधारात त्यांची हालचाल वाढते

प्रकाशापेक्षा अंधारात झुरळे अधिक सुरक्षित वाटतात. त्यामुळे रात्री त्यांची वर्दळ वाढलेली दिसते.

Cockroach

अन्न उघडे ठेवू नका

रात्री झोपण्यापूर्वी सर्व अन्नपदार्थ झाकून ठेवा. टेबल किंवा गॅसवर अन्नाचे कण राहणार नाहीत याची काळजी घ्या.

Cockroach

किचन रोज स्वच्छ ठेवा

सिंक, गॅस, प्लॅटफॉर्म आणि कचरापेटी नियमित स्वच्छ केल्यास झुरळांचा वावर कमी होऊ शकतो.

Cockroach

भेगा आणि फटी बंद करा

भिंतीतील, कपाटातील किंवा सिंकजवळील भेगांमधून झुरळे घरात प्रवेश करतात. या जागा सील करणे उपयुक्त ठरते.

Cockroach

कचरापेटी झाकून ठेवा

ओला कचरा रात्रभर घरात साचू देऊ नका. झाकण असलेली कचरापेटी वापरा आणि ती नियमित रिकामी करा.

Cockroach

झुरळांचा त्रास वाढल्यास उपाय करा

घरगुती उपाय करूनही झुरळांचा त्रास कमी होत नसेल, तर सुरक्षित आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने पेस्ट कंट्रोल करून घेणे योग्य ठरू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

<strong>येथे क्लिक करा...</strong>