पुढारी वृत्तसेवा
ती हवा नव्हे, नायट्रोजन आहे:
वेफर्सच्या पाकिटात भरलेला वायू हा ऑक्सिजन नसून नायट्रोजन गॅस असतो.
चिप्स तुटण्यापासून बचाव:
नायट्रोजन वायू वेफर्सना वाहतुकीदरम्यान धक्क्यांपासून वाचवून त्यांचा चुरा होण्यापासून संरक्षण करतो.
संरक्षक कवच:
पाकिटातील वायू चिप्ससाठी 'कुशनिंग इफेक्ट' (Protective Cushion) म्हणून काम करतो.
ऑक्सिडेशन थांबवणे:
नायट्रोजनमुळे वेफर्समधील तेल ऑक्सिजनच्या संपर्कात येत नाही आणि ऑक्सिडेशन प्रक्रिया थांबते.
कुरकुरीतपणा टिकतो:
ऑक्सिडेशन न झाल्यामुळे वेफर्सचा कुरकुरीतपणा आणि ताजेपणा दीर्घकाळ टिकून राहतो.
उत्पादनाची शेल्फ लाइफ:
नायट्रोजन वायू वेफर्सची 'शेल्फ लाइफ' (उत्पादन टिकण्याचा कालावधी) वाढवतो
नायट्रोजन सुरक्षित:
हा वायू रंगहीन, गंधहीन आणि मानवी आरोग्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे.
विक्रीची रणनीती:
मोठे आणि फुगलेले पाकीट ग्राहकांना अधिक आकर्षक वाटते, ज्यामुळे विक्री वाढते (Psychological effect).
फसवणूक नाही, वैज्ञानिक गरज:
पाकिटातील हवा ही कंपन्यांची फसवणूक नसून, चिप्सची गुणवत्ता टिकवून ठेवण्याची वैज्ञानिक गरज आहे.