पुढारी वृत्तसेवा
विजेच्या तारांवर बसुनही पक्षांना विजेचा झटका बसत नाही याच कारण माहिती नाही, मग जाणून घ्या..
विजेचा प्रवाह तेंव्हाच प्रवाहित होतो जेंव्हा त्याचे पूर्ण सर्किट बनते. म्हणजे वीज एका तारेतून दुसऱ्या तारेपर्यंत किंवा जमिनीत पोहोचते.
पक्षी आकाराने लहान असतात. ते एकाच तारेवर बसल्याने त्यांचा एकाच तारेला स्पर्श होतो. दुसर्या वायरला किंवा जमिनीला स्पर्श न झाल्यामुळे त्यांना विजेचा झटका बसत नाही.
तर माकड जेंव्हा विजेच्या तारेवरून जात असते तेंव्हा त्याच्या शेपटीचा किंवा हाताचा दुसऱ्या तारेला स्पर्श होतो. तेंव्हा वीज प्रवाहित होउन त्याला विजेचा धक्का बसून ते तारेलाच चिकटते.
वीज जास्त होल्टेजकडून कमी होल्टेजकडे प्रवाहित होते. अशात एखादा सजीव प्राणी दोन वेगवेगळ्या व्होल्टेज तारांच्या संपर्कात आला तर विद्यु प्रवाह प्रवाहित होतो.
एखाद्या व्यक्तीचा किंवा प्राण्याचा एकाचवेळी विद्युत तारेला आणि जमिनीला स्पर्श होत असेल तर वीज कमी क्षमतेच्या जमिनीकडे वाहते आणि शॉक लागू शकतो.
पक्षी आकाराने लहान असतात. त्यामुळे वीज प्रवाहित होण्यासाठी मार्ग राहत नाही. अशावेळी त्यांचा दुसऱ्या तारेला स्पर्श झाला तरच विजेचा झटका बसू शकतो.
जर एखादा पक्षी विजेच्या तारेवर बसता असताना त्याचवेळी त्याच्या पंखाचा दुसऱ्या जास्त व्होल्टेजच्या तारेला स्पर्श झाला तर विजेचा धक्का बसू शकतो.