Children crying reasons: मुलं छोट्या-छोट्या गोष्टीवरही रडतात? यामागे असू शकतात 'ही' ७ कारणं

पुढारी वृत्तसेवा

भावना व्यक्त करण्याची पद्धत

मुलं बऱ्याचदा बोलून आपल्या भावना समजावून सांगू शकत नाहीत, त्यामुळे ते रडणे हाच मार्ग निवडतात.

भूक किंवा थकवा

भूक लागली असेल किंवा झोप पूर्ण झाली नसेल, तर लहान मुलांमध्ये चिडचिड वाढते आणि ते छोट्या गोष्टीवरही रडतात.

हट्टीपणा आणि स्वतःचे मत

जेव्हा मुलांच्या मनासारखे होत नाही, तेव्हा ते आपले लक्ष वेधून घेण्यासाठी किंवा हट्ट पूर्ण करण्यासाठी रडतात.

अतिसंवेदनशील स्वभाव

काही मुलं स्वभावाने खूप संवेदनशील असतात, त्यांना लहान-सहान गोष्टींचाही मनावर लवकर ताण येतो.

भीती किंवा असुरक्षितता

अनोळखी परिस्थिती, अंधार किंवा भीतीमुळे मुलं पटकन घाबरतात आणि रडायला लागतात.

पालकांचे लक्ष वेधणे

जर पालकांचे लक्ष आपल्याकडे नसेल, तर अनेकदा मुलं लक्ष वेधून घेण्यासाठी रडण्याचा आधार घेतात.

भावनिक बदल

घरातील वातावरण किंवा जीवनशैलीत अचानक झालेला बदलही लहान मुलांच्या मनावर परिणाम करतो.

Parents Fighting Affect on Child | Pudhari Photo

समजून घेणे गरजेचे

अशा वेळी पालकांनी मुलांवर रागवण्याऐवजी त्यांच्याशी प्रेमाने बोलून त्यांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत.

येथे क्लिक करा...