मोनिका क्षीरसागर
मुलं सतत खोटं बोलत असतील तर त्यामागे भीती, शिक्षा किंवा पालकांची प्रतिक्रिया यांसारखी अनेक कारणं असू शकतात.
चूक केल्यावर मुलांना सतत ओरडणे किंवा कठोर शिक्षा करणे, त्यांना सत्य लपवण्याची सवय लावू शकते.
‘तू नेहमी खोटं बोलतोस’ असा ठपका ठेवण्याऐवजी मुलांनी सत्य सांगितल्यावर त्यांचं कौतुक करा.
मुलांची इतर मुलांशी तुलना केल्याने त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होऊ शकतो आणि ते स्वतःला चांगलं दाखवण्यासाठी खोटं बोलू शकतात.
पालक स्वतः छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये खोटं बोलत असतील, तर मुलं त्याच वर्तनाचं अनुकरण करू शकतात.
मुलांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतल्यास त्यांना आपली चूक किंवा अडचण मोकळेपणाने सांगण्याचा आत्मविश्वास मिळतो.
खोटं बोलण्यामागचं कारण समजून घेऊन प्रेमाने आणि संयमाने संवाद साधणे, केवळ शिक्षा करण्यापेक्षा अधिक प्रभावी ठरू शकते.
मुलांमध्ये प्रामाणिकपणाची सवय रुजवण्यासाठी घरात विश्वासाचं आणि सुरक्षित वातावरण तयार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.