Anirudha Sankpal
आहारात चहा, कॉफी किंवा जंक फूडसारख्या अॅसिडिक फूड्सचे सेवन केल्याने शरीरात इन्फ्लेमेशन वाढून शुगर लेव्हलवर विपरीत परिणाम होतो.
आहारात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता असणे, जसे की व्हिटॅमिन डी, बी१२ किंवा मॅग्नेशियम, यामुळे शरीरावर आणि मधुमेहावर वाईट प्रभाव पडतो.
दैनंदिन आहारात डेयरी प्रॉडक्ट्सचा अतिवापर केल्याने शरीरातील आयजीएफ (IGF) वाढून इन्सुलिन रेजिस्तान वाढीस लागतो.
रक्तातील अतिरिक्त साखरेमुळे शरीराला जास्त इन्सुलिन बनवावे लागते, जे नंतर विसरल फॅटमध्ये बदलून इन्सुलिन फॅट वाढवते.
धमन्या आणि नसांच्या मधील खराब लिम्फेटिक रक्त अभिसरणामुळे (Blood Circulation) मधुमेहाचे नियंत्रण बिघडते.
वयानुसार होणारी स्नायूंची कमजोरी (सार्कोपीनिया) कारणीभूत ठरते, कारण स्नायू शरीरातून मोठ्या प्रमाणात ग्लुकोज शोषून घेतात.
सततच्या मानसिक ताणामुळे (Stress) कोर्टिसोल हार्मोन वाढून लिवर आणि स्नायूंत साठलेला ग्लुकोज रक्तामध्ये मिसळू लागतो.
झोपेशी संबंधित समस्या किंवा खराब स्लीप क्वालिटी असण्याचा थेट आणि नकारात्मक परिणाम रक्तातील साखरेच्या प्रमाणावर होतो.