Refined Flour Processing: फक्त 'कॅलरीज' अशी ख्याती असलेला 'मैदा' तयार कसा होतो?

Anirudha Sankpal

जरी गव्हापासून तयार केला तरी...

मैदा गहूपासूनच तयार केला जात असला, तरी प्रक्रियेनंतर त्यातील गव्हाचे पौष्टिक तत्व ना के बराबर उरतात.

गव्हाचे दाणे केले जातात मऊ

कारखान्यात आल्यावर गव्हाची स्वच्छता करून, खडे व धूलकण वेगळे केले जातात आणि मॉइस्चर देऊन त्याचे दाणे मऊ केले जातात.

गव्हाचे तीन भाग

गव्हाच्या तीन भागांपैकी (ब्रान, जर्म आणि एंडोस्पर्म) सर्वात बाहेरील चोकर व आतील अंकुर काढून टाकला जातो आणि केवळ पांढऱ्या भागापासून (एंडोस्पर्म) मैदा बनवला जातो.

फक्त कॅलरी, स्टार्च अन्...

मैदामध्ये केवळ कॅलरीज, स्टार्च आणि कार्बोहायड्रेट्स असतात, तर शरीरासाठी आवश्यक फायबर आणि विटामिन्स पूर्णपणे नष्ट झालेले असतात.

म्हणून पचायला जड

फायबरच्या अभावामुळे मैदा पचायला जड जातो, ज्यामुळे बद्धकोष्ठता, पोटदुखी आणि पोट फुगण्याच्या समस्या उद्भवतात.

मधुमेहाच्या रूग्णांनी लांबच रहावे

मैदा खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढते (ब्लड शुगर स्पाइक), ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना त्याचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो.

मैद्याने पोट लवकर भरत नाही

मैदा खाल्ल्याने पोट लवकर भरत नाही आणि भूक जास्त लागत असल्याने अतिखाण्याच्या (Overeating) सवयीमुळे झपाट्याने वजन वाढू लागते.

मर्यादित प्रमाणात सेवन

वजन कमी करायचे असेल तर मैदा पूर्णपणे टाळावा, अन्यथा तो नेहमी खाण्याऐवजी कधीतरी (हिवाळ्यात) आणि मर्यादित प्रमाणात सेवन करावा.

येथे क्लिक करा