blood sugar in summer | उन्हाळ्यात अचानक का बदलते 'ब्लड शुगर'? जाणून घ्या ही ७ महत्त्वाची कारणे

पुढारी वृत्तसेवा

संशोधनानुसार, उन्हाळ्याच्या महिन्यांत रक्तातील साखरेच्या पातळीत कमी-अधिक प्रमाणात चढ-उतार होतात.

म्हणूनच, उन्हाळ्याच्या दिवसांत रक्तातील साखरेवर योग्य नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक असते.

तुमच्या शरीरातील ग्लुकोजची पातळी वातावरणातील उष्णतेला आणि तापमानातील बदलांना प्रतिसाद देत असल्‍याने हे बदल होतात.

संशोधनानुसार, शरीरात पाणी कमी झाल्यास डीहायड्रेशन रक्तातील द्रवपदार्थ घटतात, ज्यामुळे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढू शकते.

एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे की, अति उष्णतेमुळे इन्सुलिन शरीरात वेगाने शोषले जाते, ज्यामुळे हायपोग्लायसेमिया (रक्तातील साखर अचानक खूप कमी होणे) चा धोका वाढू शकतो.

मधुमेहावरील संशोधनानुसार, अति उष्णतेमुळे शरीराची इन्सुलिन शोषून घेण्याची क्षमता आणि त्याच्या कार्यपद्धतीमध्ये बदल होऊ शकतात.

कडक उन्हाळ्यात जास्त घाम आल्यामुळे शरीरातील महत्त्वाचे इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात, ज्यामुळे 'हीट स्ट्रेस' (उष्णतेचा ताण) येऊ शकतो.

भूक कमी होणे: उन्हाळ्यात भूक मंदावल्यामुळे जेवण वेळेवर न झाल्यास रक्तातील साखरेची पातळी अचानक खालावण्याचा (लो शुगर) धोका असतो.

तुम्‍हाला मधुमेहाचा त्रास असेल तर वेळेवर डॉक्टरांचा सल्ला आणि शुगर चेकअप"बरोबरच आहाराचे नियोजन करणे आवश्‍यक आहे.

येथे क्‍लिक करा.