Kidney Stone Causes | किडनी स्टोन का होतो? जाणून घ्या ७ मुख्य कारणे!

पुढारी वृत्तसेवा

किडनीमध्ये खनिजे (minerals) जमा झाल्यामुळे मुतखडा तयार होतो. यामुळे किडनीच्या सामान्य कार्यात अडथळा निर्माण होतो.

तीव्र डिहायड्रेशन (शरीरात पाण्याची कमतरता): जेव्हा शरीरात पाण्याची अत्यंत कमतरता निर्माण होते, तेव्हा किडनीमध्ये खनिजे आणि क्षार जमा होऊ लागतात.

जेव्हा आहारात आवश्यक पोषक तत्वे, जीवनसत्त्वे (विटामिन्स) किंवा खनिजांची कमतरता असते, तेव्हा किडनीमध्ये खडे तयार होऊ शकतात.

दीर्घकालीन आजार: मधुमेह (डायबिटीज), लठ्ठपणा किंवा इतर कोणताही दीर्घकालीन आजार असेल, तर त्याचा थेट परिणाम तुमच्या किडनीच्या कार्यक्षमतेवर होऊ शकतो.

पचनसंस्थेमध्ये बिघाड झाला आणि आतड्यांना पोषक तत्वे शोषून घेण्यास त्रास होत असेल, तर त्याचा किडनीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

वारंवार यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (मूत्रमार्गाचा संसर्ग) होत असेल, तर मुतखडा होण्याचा धोका वाढू शकतो.

मुतखड्याला कारणीभूत असणारे जीन्स (जनुक) असतील, तर तुम्हाला अनुवांशिकदृष्ट्या मुतखडा होण्याचा धोका जास्त असू शकतो.

काही ठराविक औषधांचे अतिसेवन केले, जे किडनीमध्ये 'ऑक्झिलेट'च्या स्वरूपात जमा होतात, तर मुतखडा तयार होऊ शकतो.

टीप: ही इंटरनेट स्रोतांवर आधारित माहिती केवळ मार्गदर्शनासाठीआहे. तुम्‍हाला काही शारीरीक लक्षणे असल्‍यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या."

येथे क्‍लिक करा.