Diabetes & menopause: महिलांनी रजोनिवृत्तीच्या काळात 'शुगर'ची अधिक काळजी का घ्यावी?

Anirudha Sankpal

नवीन संशोधन

'द मेनोपॉज सोसायटी'मध्ये प्रकाशित दक्षिण कोरियन अभ्यासानुसार टाईप २ मधुमेह मध्यवयीन महिलांमधील रजोनिवृत्तीची लक्षणे अधिक गंभीर करतो.

तीव्र लक्षणे

मधुमेहाने ग्रस्त असलेल्या महिलांना इतर महिलांच्या तुलनेत रजोनिवृत्तीदरम्यान अधिक शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.

व्हॅसोमोटर लक्षणे

अभ्यासानुसार मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल असणाऱ्या महिलांमध्ये रक्तवाहिन्यांशी संबंधित (व्हॅसोमोटर) लक्षणे जसे की हॉट फ्लॅश आणि रात्री घाम येणे जास्त प्रमाणात दिसून येतात.

हृदयरोग व चयापचय धोका

व्हॅसोमोटर लक्षणे जास्त असलेल्या महिलांमध्ये कार्डिओमेटाबॉलिक (हृदय आणि चयापचय) विकारांचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो.

हॉर्मोनल बदल

रजोनिवृत्तीदरम्यान होणाऱ्या संप्रेरकांमधील (हॉर्मोन्स) बदलांमुळे महिलांचे वजन वाढणे, पोटावर चरबी साचणे आणि इन्सुलिन रोध (इन्सुलिन रेजिस्टन्स) वाढणे यांसारख्या समस्या उद्भवतात.

मधुमेहाचा वाढता धोका

शरीरातील इन्सुलिन रोध वाढल्यामुळे रजोनिवृत्तीच्या काळात महिलांना मधुमेह होण्याचा किंवा आधीच असलेला मधुमेह बिघडण्याचा धोका असतो.

संशोधनाचे महत्त्व

सर्वच महिलांना रजोनिवृत्तीच्या टप्प्यातून जावे लागत असल्याने, या काळात आरोग्याची आणि रक्तातील साखरेची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

वैद्यकीय सल्ला

डॉक्टरांच्या मते, योग्य आहार, नियमित व्यायाम आणि साखरेचे नियंत्रण ठेवून महिला रजोनिवृत्तीतील या गंभीर लक्षणांचा प्रभाव कमी करू शकतात.

येथे क्लिक करा