मोनिका क्षीरसागर
हिंदू धर्मात सामान्यतः काळा रंग अशुभ मानला जात असला, तरी मकर संक्रांतीला मात्र तो अत्यंत शुभ मानला जातो.
मकर संक्रांतीचा सण हा हिवाळ्यात येत असल्याने, या दिवशी काळे कपडे घालण्यामागे एक खास वैज्ञानिक कारण दडले आहे.
काळा रंग हा उष्णता शोषून घेणारा (Heat Absorbent) असतो, ज्यामुळे थंडीच्या दिवसांत शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यास मदत होते.
या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि वातावरणात बदल होऊ लागतात, त्या काळात थंडीपासून संरक्षणासाठी काळा रंग प्रभावी ठरतो.
मकर संक्रांती हा सण नव्या ऋतूच्या स्वागताचा मानला जातो, त्यामुळे या दिवशी काळ्या साड्या किंवा कपडे परिधान करण्याची प्रथा आहे.
विशेषतः महाराष्ट्रात नव्याने लग्न झालेल्या स्त्रिया आणि लहान मुले या दिवशी काळ्या रंगाचे कपडे आवर्जून परिधान करतात.
आध्यात्मिक दृष्टिकोनातून, या दिवशी काळा रंग परिधान केल्याने नकारात्मकता नष्ट होते आणि मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते अशीही धारणा आहे.
म्हणूनच, इतर वेळी वर्ज्य मानला जाणारा काळा रंग या सणाला मात्र सौभाग्याचे आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो.