पुढारी वृत्तसेवा
खानपान सेम असतानाही अनेक पुरुषांचे पोट बाहेर येऊ लागते. तज्ज्ञांनी यामागचे खरे कारण सांगितले आहे.
आज अनेक पुरुष सांगतात की, त्यांचा आहार पूर्वीसारखाच आहे. तरीही 30 वर्षांनंतर पोट वाढू लागते.
अनेकांना वाटते जंक फूड किंवा बाहेरचे खाणे हीच पोट वाढण्याची कारणे आहेत. पण प्रत्यक्षात कारणे वेगळी असतात.
तज्ज्ञांच्या मते 30 नंतर शरीराचा मेटाबॉलिज्म मंदावतो. त्यामुळे जास्त कॅलरीज शरीरात फॅटच्या रूपात साठू लागतात.
वय वाढल्यावर शरीरातील मसल्स मास हळूहळू कमी होते. त्यामुळे शरीराची कॅलरी बर्न करण्याची क्षमता कमी होते.
फिजिकल अॅक्टिव्हिटी कमी आणि रिफाइंड कार्ब्स जास्त असतील तर इन्सुलिन रेसिस्टन्स वाढतो. त्यामुळे पोटाजवळ चरबी वाढते.
जास्त ताण, उशिरापर्यंत जागरण आणि झोप कमी होणे यामुळे कॉर्टिसोल हार्मोन वाढतो. यामुळे पोटाजवळ फॅट साठते.
30 नंतर शरीर अल्कोहोल व्यवस्थित मेटाबोलाइज करू शकत नाही. त्यामुळे लिव्हर आणि पोटाजवळ चरबी वाढू शकते.
डाएटमध्ये प्रोटीन वाढवा, नियमित व्यायाम करा आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग करा. यामुळे मेटाबॉलिज्म चांगला होतो.
7–8 तासांची झोप, ताण कमी करणे आणि संतुलित आहार ठेवणे आवश्यक आहे. फक्त कमी खाणे पुरेसे नसते, लाइफस्टाइल बदलणेही गरजेचे आहे.