पुढारी वृत्तसेवा
वेस्ट इंडिजविरुद्ध 97 धावांची शानदार खेळी केल्यानंतर सोशल मीडियावर सॅमसनच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.
टी-20 विश्वचषकाच्या सुपर 8 मधील शेवटच्या सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिज आमनेसामने होते. हा सामना जिंकणाऱ्या संघाला सेमीफायनलची संधी होती.
भारताने 196 धावांचे लक्ष्य गाठत मोठा विक्रम केला. टी-20 विश्वचषकात भारताने केलेला हा सर्वात मोठा यशस्वी रनचेस ठरला.
संजू सॅमसनने नाबाद 97 धावांची शानदार खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. ही खेळी शतका इतकीच महत्त्वाची मानली जात आहे.
या विजयामुळे भारतीय संघ सहाव्यांदा टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला.
सॅमसनच्या या खेळीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. चाहत्यांनी त्याच्या खेळीचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले.
गेल्या 30 दिवसांत सॅमसनच्या इन्स्टाग्राम सोशल मीडिया अकाउंटवर तब्बल 21,68,583 नवीन फॉलोअर्स वाढले.
त्याच्या शानदार खेळीमुळे आणि सातत्यपूर्ण कामगिरीमुळे संजू सॅमसनची लोकप्रियता आणखी वाढली आहे.
सोशल मीडियावर चाहत्यांनी सॅमसनच्या खेळीचे व्हिडिओ आणि पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर केल्या आहेत.
आता सर्वांचे लक्ष सेमीफायनल सामन्याकडे लागले आहे. सॅमसन पुन्हा अशीच दमदार खेळी करेल का, याकडे चाहत्यांचे लक्ष आहे.