Belly Fat: तिशीत पोटाचा घेर का वाढतो...? डॉक्टरांनी सांगितलं कारण

Anirudha Sankpal

वयाची ३० ओलांडल्यानंतर स्नायूंचे प्रमाण (Muscle Mass) दर दशकात ३-८% कमी होते, ज्यामुळे कॅलरी बर्न होण्याची प्रक्रिया मंदावते.

स्नायू कमी झाल्यामुळे रक्तातील साखर वेगाने वापरली जात नाही आणि ती पोटावर चरबीच्या रूपात जमा होऊ लागते.

वाढत्या वयानुसार शरीराची 'इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी' कमी होते, ज्यामुळे कार्बोहायड्रेट्सचे रूपांतर चरबीत सहजपणे होते.

शरीरातील ग्रोथ हार्मोन, टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजेनची पातळी कमी झाल्यामुळे पोटाच्या घेर वाढण्यास मदत होते.

ताण निर्माण करणाऱ्या 'कॉर्टिसोल' हार्मोनमध्ये वाढ झाल्याने पोटाच्या खोल भागात (Visceral Fat) चरबी साठते.

फॅटी लिव्हर, प्रीडायबिटीज किंवा उच्च ट्रायग्लिसराइड्सची समस्या असलेल्या लोकांमध्ये हा परिणाम अधिक वेगाने दिसून येतो.

हे रोखण्यासाठी आहारात जास्तीत जास्त प्रथिनांचा (Protein) समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे.

आठवड्यातून किमान तीन वेळा 'स्ट्रेंथ ट्रेनिंग' (Strength Training) केल्याने स्नायू टिकवून ठेवण्यास आणि चरबी जाळण्यास मदत होते.

दररोज चालणे, ७-८ तास पुरेशी झोप घेणे आणि सक्रिय जीवनशैली राखणे हाच बेली फॅट कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे.

येथे क्लिक करा