Height Growth & Sleep: रात्रीची ही वेळ ठरवते मुलांची उंची; काय आहे त्यामागचं शास्त्र?

Anirudha Sankpal

ग्रोथ हार्मोनची निर्मिती

मुलांच्या शारीरिक वाढीसाठी आणि उंची वाढवण्यासाठी आवश्यक असणारा ग्रोथ हार्मोन (Growth Hormone) प्रामुख्याने रात्रीच्या गाढ झोपेत स्रवतो.

पिच्युटरी ग्रंथीची भूमिका

रात्री झोपेत असताना मेंदूतील पिच्युटरी ग्रंथी (Pituitary Gland) मधून हा संप्रेरक सर्वाधिक प्रमाणात रक्तामध्ये सोडला जातो.

निसर्गाची वेळ

शास्त्रीय संशोधनानुसार, रात्री १० ते पहाटे २ या वेळेत शरीरात ग्रोथ हार्मोन तयार होण्याची प्रक्रिया अत्यंत वेगाने आणि उच्च पातळीवर चालते.

स्क्रीन टाईमचा अडथळा

रात्री उशिरापर्यंत मोबाईल किंवा टीव्ही पाहिल्यामुळे मोबाईलच्या स्क्रीनवरून निघणारा निळा प्रकाश (Blue Light) झोपेचे हॉर्मोन असलेल्या मेलाटोनिनच्या निर्मितीत अडथळा आणतो.

उंची खुंटण्याची भीती

जर मूल रात्री १२ किंवा १ वाजेपर्यंत जागे असेल, तर ते गाढ झोपेच्या नैसर्गिक चक्रात (Deep Sleep Cycle) पोहोचू शकत नाही, ज्यामुळे उंची खुंटण्याची शक्यता वाढते.

स्क्रीन बंदीचे महत्त्व

मुलांच्या योग्य शारीरिक विकासासाठी रात्री १० वाजण्यापूर्वी मोबाईल, टीव्ही व सर्व प्रकारच्या स्क्रीन पूर्णपणे बंद करणे अत्यंत गरजेचे आहे.

झोपेचे महत्त्व

पुरेशी आणि गाढ झोप ही मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी कोणत्याही औषधापेक्षा किंवा टॉनिकपेक्षा अधिक प्रभावी ठरते.

पालकांची भूमिका

मुलांमध्ये लहानपणापासूनच रात्री लवकर झोपण्याची आणि सकाळी लवकर उठण्याची आरोग्यदायी सवय लावणे पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

येथे क्लिक करा