Planning A Second Child: दुसऱ्या बाळाचा विचार करताय... आधी स्वतःला हे प्रश्न नक्की विचारा

Anirudha Sankpal

मुलांसोबतचा आनंद

पहिले मूल झाल्यानंतर दुसऱ्या बाळाचा विचार करताना स्वतःला विचारा की तुम्हाला मुलांसोबत वेळ घालवण्यात खरोखर आनंद वाटतो का?

शारीरिक व मानसिक क्षमता

कुटुंबात नवीन पाहुणा आणण्यापूर्वी तुमची शारीरिक आणि मानसिक क्षमता या नवीन जबाबदारीचा ताण पेलण्यास सक्षम आहे का, हे तपासा.

आर्थिक नियोजन

दोन मुलांचा सांभाळ, शिक्षण आणि भविष्यातील खर्च लक्षात घेता तुमचे आर्थिक गणित व्यवस्थित जुळत आहे का, याचा गांभीर्याने विचार करा.

पहिल्या मुलाची तयारी

नवीन बाळ येणार ही आनंदाची बातमी पहिल्या मुलासाठी सुखद व्हावी, यासाठी त्याला किंवा तिलाही या संपूर्ण प्रवासात हळूहळू सहभागी करून घ्या.

आईचे करिअर

दुसऱ्या बाळाचा निर्णय घेण्यापूर्वी आईच्या करिअरवर होणारा परिणाम आणि समतोल कसा साधायचा, याचा आधीच विचार करून ठेवा.

वयातील अंतर

मोठ्या आणि छोट्या मुलामध्ये योग्य ते अंतर किती असावे, जेणेकरून दोन्ही मुलांचा योग्य प्रकारे सांभाळ करणे शक्य होईल, हे ठरवा.

सपोर्ट सिस्टम

मुलांच्या संगोपनासाठी आणि घरच्या कामात हातभार लावण्यासाठी तुमच्याकडे हक्काची आणि विश्वासाची सपोर्ट सिस्टम (कुटुंब किंवा मदतनीस) उपलब्ध आहे ना?

विचारपूर्वक निर्णय

दुसऱ्या मुलाचा निर्णय कोणत्याही दबावाखाली न घेता, परिपक्वतेने, विचारपूर्वक आणि संपूर्ण कुटुंबाच्या आनंदाचा विचार करूनच घ्यावा.

येथे क्लिक करा