स्वालिया न. शिकलगार
पाम ऑईलमध्ये सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण खूप जास्त असते.
यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढून रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात.
कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे बीपी अनियंत्रित होतो.
नियमित पाम ऑईल खाल्ल्यास हार्ट अटॅक, स्ट्रोकचा धोका वाढतो.
पाम ऑईलमध्ये कॅलरीज आणि फॅट्स भरपूर असतात.
ते पचायला जड असल्याने पोटावरची चरबी,वजन झपाट्याने वाढते.
तसेच गॅस, ॲसिडिटी, अपचन, बद्धकोष्ठते सारख्या पोटाच्या तक्रारी उद्भवतात.
या तेलातील अतिरिक्त फॅट्स यकृतामध्ये साचू लागतात
ज्यामुळे 'फॅटी लिव्हर'चा त्रास सुरू होण्याची शक्यता असते.
रिफाईंड पाम ऑईलच्या अतिवापरामुळे शरीरातील अंतर्गत सूज वाढते
ज्यामुळे सांधेदुखी आणि इतर जुनाट आजार बळावू शकतात.
आरोग्यासाठी शेंगदाणा, मोहरी, तीळ, सूर्यफूल तेलचा मर्यादित वापर करावे