Sankashti Chaturthi special Ukadiche Modak|उकडीचे मोदक वातड होतात? 'या' ५ टिप्स नक्की वापरा

स्वालिया न. शिकलगार

उकडीसाठी जुना/आंबेमोहोर, इंद्रायणी तांदूळ वापरा

तांदूळ धुऊन सावलीत सुकवून बारीक दळून घ्यावा.

१ वाटी तांदळाच्या पिठासाठी पाऊण वाटी पाणी आणि थोडे दूध घ्यावे

पाणी जास्त झाल्यास पीठ चिकट होते, कमी झाल्यास उकड कोरडी पडते.

पाण्यात चिमूटभर मीठ आणि १ चमचा साजूक तूप टाकून उकळ आणावी

गॅस मंद करून पीठ टाकावे, ढवळावे आणि झाकण ठेवून ५ मिनिटे वाफ काढावी.

उकड पूर्ण थंड होऊ देऊ नका. हाताला थोडे तूप किंवा थंड पाणी लावून घ्या

उकड कोमट असतानाच वाटीने किंवा हाताने नीट मळून घ्यावी.

खास टीप्स-पीठ मळल्यावर ओल्या सुती कापडाने झाकून ठेवावे

मोदक वाफवताना चाळणीला तूप/हळदीचे पान लावावे

पाणी उकळल्यानंतरच मोदक वाफायला ठेवावेत.

Seniors Winter Knee Pain | pinterest
Seniors Winter Knee Pain:गुडघ्यांचा त्रास थंडीत वाढतो? वयोवृद्धांनी कशी घ्यावी काळजी?