कमी वयात विसरण्याची सवय का वाढतेय? जाणून घ्या कारणं

पुढारी वृत्तसेवा

कमी वयातच विसरण्याची सवय?

आजकाल तरुणांनाही लहानसहान गोष्टी विसरण्याचा त्रास जाणवतोय. सतत मोबाईल वापरण्याची सवय यामागचं एक कारण असू शकते.

सतत मोबाईलचा वापर

सतत येणारे नोटिफिकेशन आणि सोशल मीडियावर स्क्रोल करण्याची सवय लक्ष विचलित करू शकते. त्यामुळे नवीन माहिती लक्षात ठेवणं कठीण होऊ शकतं.

प्रत्येक गोष्ट मोबाईलमध्ये सेव्ह!

मेसेजचे स्क्रीनशॉट, लेख आणि महत्त्वाच्या गोष्टी आपण मोबाईलमध्ये साठवतो. पण माहिती सेव्ह करणं म्हणजे ती कायम लक्षात राहणं नव्हे.

तज्ज्ञांनी काय सांगितलं?

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अस्तिक जोशी यांच्या मते, एखादी गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी आधी तिच्याकडे लक्ष देणं आणि ती समजून घेणं महत्त्वाचं आहे.

एकाच वेळी अनेक कामं केल्याचा परिणाम

अभ्यास करताना मोबाईल पाहणं किंवा वारंवार काम बदलणं यामुळे एकाग्रता कमी होऊ शकते. परिणामी, माहिती नीट लक्षात राहत नाही.

काय आहे डिजिटल ऑफलोडिंग?

आठवणी आणि माहिती साठवण्यासाठी मोबाईल, नोट्स किंवा रिमाइंडरवर अवलंबून राहण्याला डिजिटल ऑफलोडिंग म्हणतात. यामुळे प्रत्येक गोष्ट स्वतः लक्षात ठेवण्याचा सराव कमी होऊ शकतो.

वाचणं आणि लक्षात ठेवणं वेगळं!

एखादी गोष्ट वाचली किंवा सेव्ह केली म्हणजे ती शिकली असं होत नाही. ती स्वतःच्या शब्दांत सांगितल्यास माहिती अधिक चांगल्या प्रकारे लक्षात राहण्यास मदत होते.

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय कराल?

वाचलेली माहिती पुस्तक बंद करून आठवण्याचा प्रयत्न करा. शिकलेल्या गोष्टींची उजळणी करा आणि मोबाईलपासून दूर राहून शांतपणे अभ्यास करा.

पुरेशी झोपही तितकीच महत्त्वाची

नियमित आणि पुरेशी झोप, प्रत्यक्ष संवाद आणि एकाग्रतेने केलेला अभ्यास मेंदूच्या कार्यासाठी उपयुक्त ठरतो. दिवसभर स्क्रीनसमोर घालवण्याचा वेळही मर्यादित ठेवा.

मोबाईल वापरा, पण स्वतःच्या स्मरणशक्तीवरही भर द्या!

तंत्रज्ञानाचा वापर योग्य पद्धतीने करा आणि माहिती लक्षात ठेवण्याचा सराव सुरू ठेवा. विसरण्याचा त्रास वारंवार होत असेल किंवा दैनंदिन जीवनावर परिणाम होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

जेवणानंतर पचनासाठी खा 'हे' ५ पारंपरिक भारतीय पदार्थ

येथे क्लिक करा