Rahul Shelke
भारतामध्ये मोबाइल नंबर 10 अंकी ठेवण्यामागे मोठं गणित आहे. हा नंबर छोटा, सोयीस्कर आणि तांत्रिकदृष्ट्या परफेक्ट मानला जातो.
10 अंकी सिस्टीममध्ये तब्बल 10 अब्ज नंबर उपलब्ध होतात. भारतासारख्या मोठ्या देशासाठी ही संख्या पुरेशी आहे.
9 अंकी नंबर असते तर फक्त 100 कोटी नंबर मिळाले असते. भारताची लोकसंख्या पाहता हे नंबर कमी पडले असते.
11 अंकी नंबर डायल करण्यास अवघड आणि वेळखाऊ झाले असते.
पहिले अंक नेटवर्क ऑपरेटर आणि सर्कल ओळखण्यासाठी असतात. हे अंक कॉल कुठे रूट करायचा ते नेटवर्कला सांगतात.
हे अंक ग्राहकाचा युनिक नंबर दर्शवतात. याच नंबरवरून दुसऱ्या व्यक्तीशी संपर्क साधला जातो.
1990 च्या दशकात भारतात 6 आणि 7 अंकी टेलिफोन नंबर होते. मोबाइल वाढल्यावर ही क्षमता अपुरी पडू लागली.
2003 च्या सुमारास TRAI ने संपूर्ण देशात 10 अंकी मोबाइल नंबर लागू केले. मोबाइल क्रांतीसाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचं होतं.
10 अंकी नंबर लक्षात ठेवायला सोपा आणि तांत्रिकदृष्ट्या सोपं आहे. लोकसंख्येला यूनिक ओळख देण्यासाठी ही सर्वोत्तम रचना आहे.