Rahul Shelke
I-POPSTAR च्या सहा आठवड्यांच्या स्पर्धेनंतर रोहित राऊत विजेता ठरला आहे. त्याने भारताचा पहिला I-POPSTAR होण्याचा मान पटकावला.
रोहितने विजेतेपदासोबत तब्बल ₹7,00,000 चे बक्षीस जिंकले आहे. हा त्याच्या करिअरसाठीचा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
रनर-अप ऋषभ पांचाल यालाही ₹3,00,000 ची बक्षीस रक्कम मिळाली. त्यालाही देशभरात ओळख मिळाली.
जज किंग म्हणाला, “I-POPSTAR ने भारतातील पॉप संगीताला भविष्य दाखवल आहे.” “येथील कलाकार ताकदवान, प्रामाणिक आणि बिनधास्त होते.”
रोहित म्हणाला, “मी इथे माझा आवाज शोधायला आलो आणि विजेता म्हणून उभा राहिलो.” “यामुळे माझ्या कलागुणांवरचा विश्वास आणखी वाढला.”
रोहित म्हणाला, “माझ्या मेंटर परमिश पाजींच्या मदतीशिवाय हे शक्य नव्हते.” त्याने चाहत्यांचेही मनापासून आभार मानले.
रोहितने आपला पुरस्कार सर्व रीजनल आणि इंडिपेंडंट कलाकारांना समर्पित केला. “ज्यांना मोठ्या मंचावर आपली स्वप्नं पूर्ण करायची आहेत, त्यांच्यासाठी ही प्रेरणा आहे,” असं तो म्हणाला.
परमिश वर्मा म्हणाले, “पहिला I-POPSTAR माझ्या टीममधून आला, हे अफाट समाधान देणारं आहे.” “रोहितची प्रगती पाहणे हा आनंदाचा प्रवास होता.”
MX Player आणि Amazon यांनी स्वतंत्र संगीतासाठी भव्य मंच उपलब्ध करून दिला.
या शोने भारत इंडिपेंडंट पॉपसाठी सज्ज असल्याचे सिद्ध केले.