पुढारी वृत्तसेवा
वाघ हा अतिशय शक्तिशाली आणि जंगलातील क्षेत्रावर अधिकार गाजविणारा प्राणी आहे. प्रत्येक नर वाघाचे जंगलात एक ठरलेले क्षेत्र असते
वाघाची डरकाळी (roar) ही त्याची एक महत्त्वाची संवाद पद्धत आहे. ही डरकाळी ३ ते ५ किमी पर्यंत ऐकू जाऊ शकते. अनेकदा रात्री किंवा पहाटे ऐकू येते.
जंगलातील आपले क्षेत्र (Territory) जाहीर करण्यासाठी वाघ डरकाळी फोडत असतो. ती साधारणतः संध्याकाळ, रात्र किंवा पहाटे जास्त ऐकू येते
दुसरा वाघ त्या क्षेत्रात येऊ नये, म्हणून वाघ डरकाळी फोडून इशारा देत असतो त्यामुळे वाघांना कळते की हे क्षेत्र आधीपासून कोणाच्या तरी ताब्यात आहे
जोडीदाराला बोलावण्यासाठी वाघ डरकाळी फोडत असतो, वाघीण जेव्हा प्रजननासाठी तयार होते, तेव्हा ती आणि नर वाघ दोघेही डरकाळ्या फोडतात
वाघिणींच्या प्रजनन काळात डरकाळ्या जास्त प्रमाणात ऐकू येतात. त्यामुळे वाघ आणि वाघिणी एकमेकांना संकेत देत असतात
वाघाला धोका वाटला (उदा. दुसरा वाघ, मानव किंवा मोठा प्राणी जवळ आला) तर तो आक्रमक डरकाळी फोडतो, ही डरकाळी सतर्क करणारी असते
पिल्लांशी किंवा कुटुंबाशी संपर्क ठेवण्यासाठी, कधी कधी वाघीण आपल्या पिल्लांना हाक मारण्यासाठीही डरकाळी फोडत असते
काही वेळा वाघ शिकारीनंतर किंवा एखाद्या प्राण्यावर हल्ला करण्याआधी डरकाळी फोडतो. मात्र बहुतेक वेळा तो शिकार करताना शांत राहतो