पुढारी वृत्तसेवा
सध्या कमी वयात मधुमेह डिटेक्ट होण्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. यामागे आपली जीवनशैली कारणीभूत आहे
शारीरिक हालचाल कमी, बैठे काम, ध्रुमपान, मद्यपान, प्रोसेस्ड फूड खाण्यावर अधिक भर यामुळे मधुमेह रूग्णांची संख्य़ा झपाट्याने वाढू लागली आहे
पोटाच्या भागात चरबी साठल्यास इन्सुलिन तयार करण्यास शरीराकडून होणारा प्रतिकार वाढू शकतो. यामुळे टाइप २ मधुमेह होण्याची शक्यता असते
दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम केल्यास वजन नियंत्रणात राहते. रक्तशर्करेचे प्रमाण कमी होऊन रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल सुधारण्यास मदत होते
पॅक्जेड पदार्थांपेक्षा फळे, भाज्या आणि तंतुमय पदार्थ असलेला आहार घ्यावा. मीठ कमी करावे. घरी तयार केलेले पदार्थ खाण्यावर भर द्यावा
मद्यपान केल्याने वजन वाढून रक्तदाब आणि ट्रायग्लिसराइडची पातळी वाढते. त्यामुळे अधिक प्रमाणात मद्यसेवन करू नये
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेऊन रक्तदाबावर नियंत्रण ठेवा. नियमित व्यायाम, समतोल आहार आणि संतुलित वजन ठेवा
नियमित रक्तातील शर्करेचे प्रमाण, रक्तदाब आणि रक्तातील कोलेस्टरॉलच्या पातळीची तपासणी करणे आवश्यक असते
ट्रान्स- फॅटमुळे हृदयविकार आणि मधुमेह होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे मत संशोधनाअंती समोर आले आहे, त्यामुळे बाहेरील पदार्थ खाण्यावर नियंत्रण ठेवा