Alcohol & Food : दारू प्यायल्यानंतर चमचमीतच का खावेसे वाटते? जाणून घ्या संशोधन काय सांगते...

पुढारी वृत्तसेवा

सिडनी विद्यापीठाच्या (University of Sydney) नव्या अभ्यासानुसार, मद्यपानामुळे खारट आणि चवदार पदार्थ खाण्याची जैविक इच्छा तीव्र होते.

संशोधनानुसार, अल्कोहोल शरीरातील 'FGF21' या हार्मोनला उत्तेजित करते. यामुळे गोड ऐवजी थेट खारट पदार्थ खाण्‍याची होते.

चार्ल्स पर्किन्स सेंटरच्या संशोधक अँडा ग्रेच यांच्या मते, २-३ पेगनंतर अचानक चिप्स, पिझ्झा खाण्याची इच्छा होण्यामागे हा हार्मोनल बदलच कारणीभूत असतो.

वरिष्ठ संशोधक डेव्हिड रॉबेनहाइमर सांगतात की, अल्कोहोलमुळे वाढलेली प्रोटीनची भूक भागवण्यासाठी लोक समोर दिसेल ते अनहेल्दी अन्न जास्त प्रमाणात खातात.

'अकॅडमी ऑफ न्यूट्रिशन अँड डाएटेटिक्स'चे डॉ. वेस्ली मॅकवॉर्टर यांच्या मते, दारु पिल्‍यानंतर अनहेल्दी खाण्‍याचा पर्याय निवडला जातो.

सेंट लुईस युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका व्हिटनी लिन्सेनमेयर सांगतात की, ही क्रेव्हिंग झाल्यास चिप्सऐवजी ताजे मासे किंवा चिकन यांसारखे हेल्दी प्रोटीन निवडावे.

वेट लॉस तज्ज्ञ डॉ. मीर अली यांच्या मते, ड्रिंक्स सोबतीला उकडलेली अंडी, पनीर, सुकामेवा किंवा पॉपकॉर्न यांसारखे पर्याय जवळ ठेवावेत.

तज्ज्ञांच्‍या मते कधीतरी फास्ट फूड खाणे ठीक आहे; पण वजन आणि आरोग्य नियंत्रणात ठेवण्यासाठी मद्यपान टाळणे आणि सकस आहार घेणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे!

येथे क्‍लिक करा.