पुढारी वृत्तसेवा
तुम्ही ८ तास झोपता; तरीही सकाळी प्रचंड थकवा जाणवतो? कदाचित झोपण्यापूर्वीच्या सवयी चुकीच्या आहेत का? जाणून घेवूया या सवयींवषयी...
बेडवर असताना फोन वापरल्याने 'मेलाटोनिन' (Melatonin) या हार्मोनची निर्मिती झपाट्याने कमी होते, जो हार्मोन आपल्या शरीराला झोपण्याचा संदेश देतो.
दारु पिल्याने सुरुवातीला गुंगी येत असली, तरी ते तुमच्या रात्रीच्या झोपेचे चक्र पूर्णपणे विस्कळीत करते.
झोपण्यापूर्वी लगेचच तेलकट किंवा जड अन्न खाल्ल्याने, तुमच्या पचनसंस्थेला प्रमाणाबाहेर जास्त काम करावे लागते.
संध्याकाळचा चहा किंवा कॉफी रात्री उशिरापर्यंत तुमच्या रक्तात राहते, यामुळे तुमची मध्यवर्ती मज्जासंस्था उत्तेजित राहते आणि झोप येत नाही.
फक्त वीकेंडला (शनिवार-रविवार) रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्याने शरीराचे चक्र बिघडते, ज्याला "सोशल जेटलॅग" (Social Jetlag) म्हणतात.
जेव्हा तुम्ही बेडवर बसून ऑफिसचे ईमेल्स वाचता किंवा अभ्यास करता, तेव्हा तुमच्या मेंदूला बेडची जोड रिलॅक्स होण्याऐवजी ताण आणि सतर्कतेशी लावण्याची सवय लागते.
गाढ झोप लागण्यासाठी आपल्या शरीराला अंतर्गत तापमान साधारण 1 ∘ C ने कमी करावे लागते (त्यामुळे खोली थंड असणे आवश्यक आहे).