Rahul Shelke
मुंबई महापालिका ही देशातील सर्वात जुनी आणि श्रीमंत महापालिकांपैकी एक आहे. पण मुंबईचे पहिले महापौर कोण होते, हे अनेकांना माहीत नसतं.
मुंबई महापालिकेचे पहिले महापौर सर जे. बी. बोमन-बेहराम हे होते.
सर जे. बी. बोमन-बेहराम यांनी १९३१ ते १९३२ या काळात मुंबईचे महापौर म्हणून काम पाहिले.
१९३१ पूर्वी महापालिकेतील प्रमुख पदाला ‘अध्यक्ष (President)’ असे म्हटले जायचे.
१९३१ साली मुंबई कायद्यात बदल करण्यात आला आणि ‘अध्यक्ष’ पदाचे नाव बदलून ‘महापौर (Mayor)’ करण्यात आले.
या बदलानंतर सर जे. बी. बोमन-बेहराम मुंबईचे पहिले अधिकृत महापौर ठरले.
मुंबई महापालिकेचे पहिले महानगरपालिका आयुक्त आर्थर क्रॉफर्ड होते. त्यांची नियुक्ती १८६५ मध्ये झाली होती.
सर फिरोजशहा मेहता यांना ‘मुंबई महापालिकेचे जनक’ मानले जाते.
सर फिरोजशहा मेहता यांनी १९०५ आणि १९११ मध्ये महापालिकेचे अध्यक्ष (President) म्हणून काम केले.