नगरसेवकाचे काय काम असते? त्याला कोणते अधिकार असतात?

Rahul Shelke

नगरसेवक कोण असतो?

नगरसेवक हा आपल्या वॉर्डातून निवडून येणारा लोकप्रतिनिधी असतो. तो वॉर्डातील नागरिकांचे प्रश्न पालिकेत मांडतो.

corporator role and responsibility | Pudhari

नगरसेवक कसा निवडला जातो?

शहराचे प्रभाग (वॉर्ड) केले जातात. त्या वॉर्डातील नागरिक मतदान करून एक प्रतिनिधी निवडतात.

corporator role and responsibility | Pudhari

नगरसेवकाची मुख्य जबाबदारी

आपल्या वॉर्डातील लोकांचे प्रश्न मांडणे. प्रशासन आणि नागरिक यांच्यात दुवा म्हणून काम करणे.

corporator role and responsibility | Pudhari

नागरिकांचे प्रतिनिधित्व

पाणी, रस्ते, कचरा, वीज अशा समस्या महानगरपालिकेपर्यंत पोहोचवणे हे नगरसेवकाचे काम असते.

corporator role and responsibility | Pudhari

विकासकामांमध्ये भूमिका

रस्ते, गटारे, पाणीपुरवठा, उद्याने, या सुविधा सुधारण्यासाठी पाठपुरावा करणे.

corporator role and responsibility | Pudhari

अर्थसंकल्पात सहभाग

महापालिकेच्या अर्थसंकल्पात आपल्या वॉर्डसाठी निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणे.

corporator role and responsibility | Pudhari

सरकारी योजना राबवणे

केंद्र व राज्य सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचतील याची काळजी घेणे.

corporator role and responsibility | Pudhari

जनतेशी थेट संपर्क

वॉर्डसभा, बैठकांमधून नागरिकांच्या तक्रारी ऐकून उपाय सुचवणे.

corporator role and responsibility | Pudhari

शिक्षण आणि आरोग्य

शाळा आणि दवाखाने यांची स्थिती सुधारण्यासाठी प्रशासनासोबत काम करणे.

corporator role and responsibility | Pudhari

प्रामाणिक नगरसेवक का महत्त्वाचा?

पारदर्शकता आणि जबाबदारी यामुळेच वॉर्डाचा खरा विकास होतो. त्यामुळे प्रामाणिक नगरसेवक असेल तर नागरिकांची कामे लवकर होतात.

corporator role and responsibility | Pudhari

सिगारेटचा शोध कोणी लावला? काय आहे यामागचा इतिहास?

Who Invented the Cigarette | Pudhari
येथे क्लिक करा