पुढारी डिजिटल टीम
डॉ. माधव मालवणकर हे मुंबईतील गिरगावात प्रॅक्टिस करणारे प्रसिद्ध फिजिओथेरपी तज्ज्ञ होते. ते त्या काळात संपूर्ण मुंबईत विशेषज्ञ डॉक्टर म्हणून ओळखले जात.
ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे डॉक्टर आणि त्यांचे जवळचे मित्र होते. त्यांच्यातील नातं विश्वास आणि आदराचं होतं.
मेडिकल शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माईसाहेब मालवणकरांच्या क्लिनिकमध्ये असिस्टंट डॉक्टर म्हणून काम करू लागल्या. याच ठिकाणी त्यांची बाबासाहेबांशी पहिली ओळख झाली.
त्या दिवशी माईसाहेबांनी बाबासाहेबांना दुपारच्या जेवणासाठी बोलावले. तेव्हा बाबासाहेब आपल्या अभ्यासिकेत बसून ‘द बुद्धा अँड हिज धम्मा’ या पुस्तकाची प्रस्तावना लिहित होते.
माईसाहेबांनी त्यांना जेवण वाढले. जेवण झाल्यावर बाबासाहेब त्यांच्या खोलीत झोपायला गेले.
दिल्लीमध्ये माईसाहेब घरासाठी लागणाऱ्या वस्तू आणि पुस्तके स्वतःच आणत असत. त्या बहुतेक वेळा बाबासाहेब झोपले असताना किंवा संसदेत असतानाच बाजारात जात.
त्या दिवशीही बाबासाहेब झोपले आणि माईसाहेब बाजारा गेल्या. बाबासाहेबांची झोप मोडू नये म्हणून त्या न सांगता बाहेर गेल्या.
ही साधीशी दिसणारी घटना माईसाहेब, बाबासाहेब आणि डॉ. मालवणकर यांच्यातील नात्याचा संवेदनशील भाग होती.