पुढारी डिजिटल टीम
याच दिवशी 6 वर्षांचे बाबासाहेब साताऱ्यातील सरकारी शाळेत दाखल झाले. हा दिवस महाराष्ट्रात विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो.
त्यावेळी ही शाळा पहिली ते चौथी होती आणि आज ती प्रतापसिंग हायस्कूल नावाने ओळखली जाते. बाबासाहेब चौथीपर्यंत याच शाळेत शिकले.
शाळा राजवाडा परिसरातील एका वाड्यात चालायची. ही हवेली 1824 साली छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस प्रतापसिंह राजे भोसले यांनी बांधली.
राजघराण्यातील मुलींना शिक्षण देण्यासाठी शाळा सुरू करण्यात आली होती. 1851 मध्ये ब्रिटिश सरकारने याला अधिकृत शाळा म्हणून मान्यता दिली.
बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ सेवानिवृत्तीनंतर साताऱ्यात स्थायिक झाले. शाळेत भरती करताना नाव लिहिले गेले: भिवा आंबडवेकर, आंबडवे गावावरून नाव ठेवले.
शाळेतले शिक्षक कृष्णाजी केशव आंबेडकर यांनी बाबासाहेबांना ‘आंबेडकर’ हे आडनाव दिले. याच नावाने पुढे त्यांची जगभर ओळख निर्माण झाली.
शाळेतील जुना रजिस्टर अजूनही जपून ठेवला आहे. त्यात क्रमांक 1914 च्या पुढे भिवा आंबेडकर यांची सही आहे. हा ऐतिहासिक दस्तऐवज आहे.
प्रतापसिंग हायस्कूलची इमारत PWD ने धोकादायक म्हणून घोषित केली आहे.
ही हवेली ऐतिहासिक वास्तू म्हणून नोंदवली गेली असली तरी आज ती उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे. (फोटो क्रेडिट - लोकेश गावटे)