First Date Bill: मुलाने की मुलीने... पहिल्या डेटवर बील कोणी भरावं?

Anirudha Sankpal

पहिल्या डेटचं बील

पहिल्या डेटवर तो किंवा ती देईल की बील या आशेवर अनेकजण बसलेले असतात. मात्र असं करण्यापेक्षा दोन्हीकडून बील पे करण्याची ऑफर दिली जाऊ शकते.

मुलांनीच दिलं पाहिजे

समाजात पहिल्या डेटवर बील हे फक्त मुलानंच दिलं पाहिजे अशी धारणा आहे. मात्र असा काही लिखित नियम नाही. मुलीला वाटलं तर ती देखील बील पे करू शकते.

ठरवून बील देत नाहीत

अनेक लोक जाणून बुजून बिल आल्यावर काहीच करत नाहीत. नुसते बसून राहतात. समोरचा काय करतोय हे पाहत राहतात.

चाचपण्या करणे

समोरचा व्यक्ती त्वरित बिल उचलतो का? तो बिल विभागून देण्याची ऑफर ठेवतो का? तो पुढच्याकडून बील भरून घेतो का? अशा चाचपण्या करणे चांगले नाही.

पहिल्यांदा बील पे केल्यावर

जर कोणी पहिल्या डेटवर बील पेड केलं नाही तर त्याचा अर्थ तो केअरिंग नाही असा होत नाही. जर कोणीतरी पूर्ण बील पे केलं याचा अर्थ तो जंटलमन आहे असा देखील नाही.

कोणती पद्धत योग्य

काही लोकांना डेटवर पूर्ण बील पेड करणे आवडते. काही लोक बील विभागून देणे पसंत करतात. दोन्ही पद्धती योग्य आहेत. तुम्हाला जे योग्य वाटतं ते पुढच्याला देखील योग्य वाटेलच असं नाही.

दबाव रहात नाही

जर दोघेही सहमत असतील तर बील विभागून पे केलं जाऊ शकतं. यामुळं एकावरच खर्चाचा बोजा पडत नाही. कोणावरही कोणताही दबाव रहात नाही.

ऑफर देऊ शकता

जर पहिल्या डेटला एक व्यक्ती पूर्ण बील पे करतो त्यावेळी दुसरा व्यक्ती पुढच्या डेटवर बील पे करण्याची ऑफर करू शकतो.

रिअॅक्शन चेक करणे चूक

टेबलवर बील आल्यावर लगेच समोरच्याची रिअॅक्शन चेक करणे, टेस्ट करण्याऐवजी थेट बोलणे कधीही चांगले. तुम्ही बील विभागून देऊ असं आरामात सांगू शकता.

येथे क्लिक करा